नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : येथील कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या भारतनगर चौकात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
या घटनेत कुणीही जखमी झाले नाही परंतु गर्डर कोसळण्याच्या काही सेकंदांपूर्वीच तिथून एक कार गेली होती. त्या कारमध्ये चार जणांचे कुटुंब होते. नागपुरात भाजपाने विकासाच्या नावाखाली बरीच कामे सुरू केली आहेत. परंतु त्यांच्या दर्जाबाबत नागरिक शंका व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी मनीष नगर उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला होता. त्यामुळे नागपुरातील उड्डाणपुलाखालून जाताना नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.






