शुक्रवारपासून तिसरी घंटा वाजणार

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : राज्यातील सिनेमागृहे, नाटय़गृहांचा पडदा शुक्रवार, २२ ऑक्टोबरपासून पुन्हा उघडणार आहे. ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सर्व कोरोना नियमांचे पालन करून सिनेमा व नाटकाचे खेळ रंगणार आहेत.

नाटय़ व सिनेमागृहे सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून याविषयीची नियमावली राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रेक्षक बसणाऱया जागांचे तसेच रंगमंचाच्या निर्जंतुकीकरणास सुरुवात झाली आहेत.

सिनेमागृहे व मल्टिप्लेक्समध्ये सिनेमागृहांत प्रवेशासाठी आरोग्य सेतू ऍप असणे आवश्यक, नसल्यास लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यासच प्रवेश. मॉलमध्ये असलेल्या मल्टिप्लेक्ससाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच प्रवेश. सिनेमा पाहण्यास येणाऱया प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. सिनेमागृहांमधील एअर कंडिशन २४ ते ३० सेल्सिअस टेपरेंचर इतका असावा.

काय आहे नियमावली नाटय़गृहांसाठी कलाकार, कर्मचारीवृंद यांची नियमितपणे कोरोना तपासणी, प्रेक्षकांमध्ये सहा फुटांचे अंतर, प्रेक्षकांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच त्यांना एण्ट्री, अभिनेत्यांना स्वतःची रंगभूषा आणि केशभूषा स्वतःच करावी लागणार प्रवेशद्वारांवर तापमान तपासूनच सभागृहात प्रवेश करता येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here