वैद्यकिय कारणाने आजही भावना गवळी ईडीसमोर येणार नाहीत; वकिलांनी दिली माहिती

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आज (बुधवार) चिकनगुनियामुळे ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे. त्यांनी ईडीकडे १५ दिवसांची मुदत मागितली आहे.



शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने २० ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत हे समन्स दिले होते. यापूर्वी २९ सप्टेंबरला त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत.



ईडीने मागील महिन्यात खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here