शेतीमाल विक्री झाली नियमन मुक्त; शेतकऱ्यांचा उत्तपादीत माल देशांतर्गत कुठेही विक्रीची मुभा

एक देश एक बाजार निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे स्वागत

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला फळे अन्नधान्य विक्रीसाठी कोणत्याही बाजारपेठेत नेण्यासाठी कसलीही आडकाठी न आणता, उत्पादित शेतमालावर स्थानिक बाजारसमितीच्या परवानगीशिवाय आपला माल देशातील कुठल्याही बाजारात सोईच्या ठिकाणी स्वतः विकू शकतो. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही संपुर्ण शेतीमाल, अन्नधान्य नियमन मुक्त केला असून सन १४ /१५ मध्ये फक्त फळे व भाजीपाला नियमन मुक्त करण्यात आला होता, त्याचे चांगले परिणामही दिसून आले असल्याने शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण शेतीमाल विक्रीचे निर्बंध उठवून ” एक देश एक बाजार ” ही संकल्पना प्रत्यक्षात व्यवहारात येत असल्याने शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट बांधावरुन विक्रीसाठी गावपातळीवर शेतकरी गटांची स्थापना करण्यात यावी व आपला ताजा भाजीपाला विक्री साठी पाठवावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू शिरसाठ, समन्नवयक कुबेर जाधव ,रमेश बापु आहिरे, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष क्रुष्णा जाधव संघटक किरण मोरे आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here