कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली १४ हजारांच्या उंबरठ्यावर

Blood sample tube positive with COVID-19 or novel coronavirus 2019 found in Wuhan, China

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ३१३ कोरोनाबाधित; २४४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.८) प्राप्त झाल्यानंतर 313 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 13 हजार 887 झाली आहे. सर्वाधिक 68 कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 244 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
आज आढळलेल्या 313 कोरोनाबाधित रूग्णांमध्ये जळगाव शहर 68, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 14, अमळनेर 53, चोपडा 26, पाचोरा 3, भडगाव 26, धरणगाव 12, यावल 14, जामनेर 26, रावेर 21, पारोळा 16, चाळीसगाव 4, मुक्ताईनगर 12, बोदवड 1 इतर जिल्ह्यातील 5 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चोपडा, भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी 2 , जळगाव तालुका, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधित रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here