बेलापूर, सीबीडी (यशवंत चव्हाण)
कोरोना असो वा नसो बेकारी,भूक आणि नशा यात आकंठ बुडालेली दिशाहीन जमात सतत महामार्ग,मोकळे किरकोळ रहदारीचे रस्ते,अश्या ठिकाणी टोळीने पण विखुरलेले लूटमार करणारे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.आतापर्यंत अश्या हजारो घटना घडल्या आहेत.हे नशेबाज विक्षिप्त लोक लोकांचे कष्टाचे दागिने,पैसे,महागड्या वस्तू बळजबरीने चोरून पसार होतात.त्यांना अटकही होते आणि सोडूनंही दिले जाते.ह्यावर अद्याप ठोस उपाय का केला जातं नाही.सबब असे सुचवावेसे वाटते कि,हि पूर्णपणे टोळी नेस्तनाभूत होत नाही तोपर्यंत जनतेने सावधपणे काही काळ मौल्यवान वस्तू चा वापर कमी अथवा सावधपणे करावा.कोणी मदतीसाठी हाक मारली तर व्हिडीओ शूट न करता मदतीला प्राधान्य द्यावे. ह्या लुटारूंना पकडण्यासाठी रेल्वे आडोसा ,उड्डाणपुलाखाली,निर्मनुष्य मोकळ्या खंडर झालेल्या इमारती व पोलिसांना ज्ञात असलेली ठिकाणे ह्यावर छापा घालून ह्याच्या मुसक्या बांधून तुरुंगात टाकावे तुरुंगात ह्यांना चांगले कपडे,अन्न व मानसिक व बौद्धिक मशागतीसाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी त्यांना रुची असलेल्या कामात उदरनिर्वाहासाठी व्यस्त ठेवावे. ह्यासाठी एनजिओची मदत घेता येईल. व त्याचबरोबर जेथून नशेच्या वस्तूंची विक्री होते अश्या ठिकाणी छापे घालून त्यांचे अड्डे उध्वस्त करावे.पोलिसांनी साध्या वेशात गस्त वाढवावी व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी.कोरोना संकट,बेरोजगारी पाहता अश्या घटनेत वाढ होणार आहे तरी प्रत्येक नागरिकाने पोलिसांना व एकमेकांना अश्या घटनेत सहकार्य करणे ही काळाची गरज आहे.







