कोकणातील पूर आणि पाणी टंचाई दुर करण्यासाठी उपक्रम
पुणे/साखरपा (उपसंपादक वासंती देवळे) : कोकणातील पूर आणि पाणी टंचाई दुर करण्यासाठी ‘नदीची पाठशाळा ‘ उपक्रम कोकणातील साखरपा येथे सामूहिक प्रयत्नातून सुरु होत आहे. शास्रीय पद्धतीचा अवलंब करून लोकसहभागातून यावर्षीचा काजळी नदीच्या पुरापासून गावास वाचवणाऱ्या साखरप्यात ‘नदीची पाठशाळा’ सुरु होत आहे .
कोकणातील व देश विदेशातील इतर गावांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम होण्याची गरज आहे.त्यासाठी हा उपक्रम श्री दत्त देवस्थान कोंडगाव साखरपा अंतर्गत काजळी नदी संवर्धन प्रकल्प,गणेश मित्र मंडळ कौडगाव साखरपा,मानवलोक संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
आपापल्या नदीला नेमका कशा प्रकारचा आजार झाला आहे? आणि त्यावर उपाय कसा करायचा ? याची शास्त्रीय बाजू आणि तंत्र उलगडवून दाखवणारी एक नदीची कार्यशाळा साखरपा, जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक 30 व 31 ऑक्टोबर 2021 रोजी पहिली कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवले आहे. कबनूरकर हॉल,रत्नागिरी कोल्हापूर हायवे पो.कोंडगाव साखरपा,तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे ही कार्यशाळा होईल .
समग्र नदी या विषयावर डॉ. अजित गोखले,नदीचे भूशास्त्र विषयावर डॉ. श्रीनिवास वडगबाळकर,पंचायती राज संस्था आणि लोकसहभाग, कामाचा आराखडा,नियोजन आणि योजनांचा समन्वय या विषयावर डॉ. सुमंत पांडे ,वादळ,पूर,पाणीटंचाई कारणे आणि अंदाज’ या विषयावर मयुरेश प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत . नदीची जैवविविधता या विषयावर डॉ माधव गाडगीळ,’आओ नदीको जाने’ विषयावर बोलण्यासाठी डॉ राजेंद्रसिंग यांना विशेष आमंत्रित करण्यात आले असून नाम फौन्डेशनचे मल्हार पाटेकर हे विशेषकरून उपस्थित राहणार आहेत.
ही शाळा सर्वांसाठी मुक्त असेल,समर्पण आणि सेवाभाव ,प्रखर इच्छाशक्ती असणाऱ्यांना मुक्त प्रवेश. नाममात्र शुल्क रु १५१.०० (सदरचे शुल्क ९४२२६२७३८०या क्रमांकावर google pay द्वारे पाठवावे किंवा निवड झालेल्यांनी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण स्थळी रोख भरावेत. ज्या कोणाला या शाळेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी स्वतःचे नाव नोंदवावे. प्रथम येणाऱ्या चाळीस जणांनाच प्रवेश मिळेल.
सेवावृती व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने ही शाळा चालवली जाणार आहे.साधा निवास आणि सात्विक भोजन व्यवस्था आयोजकांच्या तर्फे करण्यात येणार आहे.प्रशिक्षणाच्या कालावधी मधे नदी अभ्यासाकरता लागणा-या प्रवासाची सोय असेल. प्रशिक्षकही कुठलेही शुल्क न घेता प्रशिक्षण देणार आहेत.तरी मनापासून, प्रत्यक्ष काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी या शाळेमध्ये सहभागी व्हावे आणि प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे .
अधिक माहिती आणि संपर्कासाठी श्रीधर कबनूरकर दूरध्वनी क्रमांक ९४२२६२७३८०,चैतन्य सरदेशपांडे कोंडगाव साखरपा९१३०३७६७१०,मुग्धा सरदेशपांडे 9270246901 यांच्याशी संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे.आपली नोंदणी खालील गुगल फॉर्म भरून करावा
http://https://docs.google.com/forms/d/1Lu-MpJuHo-EyE2Nr7zPgUlaXrD6zaqDky7lOND8tcdY/edit?ts=616fbef3






