वडगाव व वड्डवाडी गावातील विविध विकास कामांचे उदघाटन

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : बुधवारी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील दऱ्याचे वडगाव व वड्डवाडी गावातील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. तसेच, यावेळी, वड्डवाडी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी, गावातील गावाच्या पाणंद रस्त्याचं मुरुमीकरण कामाचा शुभारंभ व जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर दऱ्याचे वडगांव या शाळेतील नवीन खोलीचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच, दहा लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या गावातील सांस्कृतिक सभागृहाच उद्घाटन करण्यात आले. तसेच, वड्डवाडी गावातील आठ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. दऱ्याचे वडगाव व वड्डवाडी या गावाच्या विकासासाठी कटीबद्ध असून, येत्या काही दिवसात चांगल्या दर्जाचे दोन मैदान निर्माण करणार करण्याचा माझा मानस आहे.

satej-patilvadgaon-vikas-kame

कोरोनाच्या या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक विकासकामे पूर्ण करण्यामध्ये अडथळा येत आहे. पण. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने सध्या हे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. या लढाईतील प्रमुख शस्त्र म्हणजे कोरोना प्रतिबंध लस. गावातील १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here