भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे आदेशानुसार केंद्रीय कार्यकारिणी सूचनेनुसार जळगाव शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत मराठा सेवा संघ जळगाव जिल्हाध्यक्षपदी अनिल पाटील तर महानगरप्रमुखपदी हिरामण हरीभाऊ चव्हाण यांची निवड करण्यात आली.
जिजाऊ पूजनाने बैठकीस सुरुवात झाली.जिजाऊ वंदना ग.स.संचालिका कल्पना पाटील यांनी गायन केले. दरम्यान मराठा सेवा संघ राज्य केंद्रीय कार्यकारिणी सूचनेनुसार जळगाव जिल्हा नुतन कार्यकारिणी निवडीसाठी केंद्रीय निवड समिती गठीत करण्यात आली होती.या समितीचे अध्यक्ष डाॕ.प्राचार्य रामकिसन पवार,मराठा सेवा संघ नाशिक विभागिय अध्यक्ष दीपक भदाणे व औरंगाबाद येथील दीपक पवार यांची त्रिस्तरीय निवड समिती स्थापन केली होती. दरम्यान बैठकीत मराठा सेवा संघाच्या कार्यासाठी दिलेला काळ,केलेली कामे व उपक्रम व संघटनेची विचारधारा लक्षात घेता जळगाव जिल्हा पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी अनिल पाटील तर जळगाव शहरब महानगरप्रमुखपदी हिरामण हरीभाऊ चव्हाण यांची निवड करण्यात आली.
दरम्यान यावेळी महानगर सचिव चंद्रकांत उत्तमराव देसले, महानगर उपाध्यक्षपदी यु.जी. पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी डाॕ.रामकिसन पवार म्हणाले मराठा सेवा संघात कोणताही जातीभेद केला जात नाही.सर्वधर्म समभाव मानुन अनिष्ठ रूढी परंपरा,कर्मकांड, अंधश्रध्दा, व ढोंगीपणाला येथे थारा दिला जात नाही. सत्यावर आधारित ज्ञान विज्ञान यावर समाजातील सर्व घटकांची सेवा सुरु आहे.नाशिक विभागिय अध्यक्ष व निवड समितीचे सदस्य दिपक भदाणे यांनी नुतन कार्यकारिणीने समाजातील बदल स्वीकार योगदान द्यावे जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करत संघटन बांधणी करावी असे आवाहन केले.
यावेळी माजी विभागीय अध्यक्ष सुरेश पाटील,सुरेंद्र पाटील,प्रा.जगदिश पाटील,माजी जिल्हाध्यक्ष राम पवार, तसेच मराठा सेवा संघाचेचे प्रचारक दिनेश कदम, यांना जिजाऊ वंदना प्रतिमा देत विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आले मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव संजय पाटील, जळगाव मराठा सेवा संघाचे जिल्हा सहसचिव संजय जप्ते, बोदवड मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुमित पाटील, सर जळगाव मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत शेजोळे, मुक्ताईनगर जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील, भुसावळ मराठा सेवा संघाच्या जिल्हा कोषाध्यक्ष अजय पाटील, यावल जिल्हा कार्याध्यक्ष योगेश पाटील, जामनेर जिल्हा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप पाटील, रावेर मराठा सेवा संघाचे जिल्हा सहसचिव गिरीश पवार, यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला डॉ.अनिल, ग.स.संचालिका कल्पना दिलीप पाटील(रावेर) प्रा.जगदिश पाटील(फैजपुर),शैलेश पाटील(भुसावळ),मधुकर पाटील,सी.ए.पवार प्रा. दीपक पवार,शरद पाटील,अमोल पाटील, गणेश देशमुख मेघशाम भदाणे,नरेंद्र पाटील,हिरामण चव्हाण, प्रदीप पाटील,घनश्याम पाटील,राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील,समाधान पाटील,सतीश बोरसे, विजय देवरे,शैलेश पाटील,परमेश्वर सोनवणे, आदिंसह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र,बुके,जिजाऊ वंदना देऊन सन्मान करण्यात आला.







