ईदे मिलाद निमित्त मोहम्मद (स.) पैगंबर सा.नी मानव समाजाला काय दिले? या मराठी पुस्तकाची हिंदू बांधवांना भेट

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : ईदे मिलाद निमित्त मोहम्मद (स.) पैगंबर सा.नी मानव समाजाला काय दिले? या मराठी पुस्तकाचे हिंदू बांधवांना भेट देणे व विविध सामाजिक उपक्रम चा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

ईदे मिलादुन्नबी निमित्त अलफैज फाऊंडेशन तर्फे कै.अनीस चिश्ती, पुणे यांनी मराठीत लिहिलेल्या मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले?या पुस्तकाचे आम्चे हिंदू बांधवांना पूर्ण सप्ताह साजरा करत असतांना आम्ही भेट म्हणून देणार आहोत.या पुस्तकात प्रेषितांनी मानवते व विविध बाबतीत काय संदेश दिले आहे?व राज्य करते,शेजार धर्म, व्यापार व इतर बांबी वर आपले जीवन जगत असताना कशा पद्धतीने आपण वाघले पाहिजे वर मार्गदर्शन केले आहे याची लेखकाने सखोल माहिती दिली आहे.

muslim-samaj

या सप्ताहचा भाग म्हणून मा.आ.सुधीर तांबे,छोटू खडके साव इतर बांधवांना सदरहू पुस्तक भेट दिली.या वेळी अलफैज फाऊंडेशन चे संस्थापक व मार्गदर्शक करीम सालार, अघ्यक्ष अजीज सालार, हमीद सालार,वकार शेख, अश्फाक मिर्झा, वगैरें उपस्थित होते. यावलला काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकरदादा सोनवणे व इतर हिंदू मुस्लीम बांधवांना पुस्तके भेट देण्यात आली.

या सप्ताहात अलफैज फाऊंडेशन तर्फे गरीबांना अन्नधान्य व कपडे वाटप,गरीब विद्यार्थ्यांना वहया व शैक्षणिक साहित्य वाटप वगैरे कार्यक्रम पुर्ण सप्ताहात राबविण्यात येईल असे फाऊंडेशन चे अध्यक्ष अजीज सालार व मुश्ताक सालार यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here