भीमा कोरेगाव प्रकरणात परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शौर्यदिनाच्या निमित्ताने १ जानेवारीला आंबेडकरी समुदाय मोठ्या प्रमाणात कोरेगाव भीमा येथे जमला होता. यावेळी कोरेगाव तसेच सणसवाडी या दोन गावांमध्ये हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच आता कोरेगाव भीमा प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.

कोरेगाव भीमा प्रकरणात परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाची चौकशी आता आयोगामार्फत करण्यात येत आहे. अशातच आता परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आयोगाचे वकिल आशिष सातपुते यांनी यासंबंधी अर्ज केला होता. भीमा कोरेगाव हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंग हे एडीजी लाॅ अँड आर्डर संभाळत होते. तर रश्मी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त होत्या, त्यामुळे त्यांची साक्ष घेणं आवश्यक असल्याचं आशिष सातपुते यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शु्क्ला अडचणीत आल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लेटर बाॅम्ब फोडल्यानंतर रश्मी शुक्ला यांचं नाव चर्चेत आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here