पुण्यात चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : चौथ्या मजल्यावरून उडी मारून राधिका पवन ससाने (वय २६) या विवाहितेने आत्महत्या केली आहे. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल समोरील सोसायटीमध्ये सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव बुद्रुक येथील माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्समध्ये पवन व राधिका हे दोघे विवाहित जोडपे राहत आहेत. आज शनिवारी सकाळी साडे आठच्या दरम्यान राधिकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली होती.

याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी उपचार कामी ससून हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती महिलेचे पती पवन नाना ससाने (रा. माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्स, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here