कोंबड्यानी भरलेला आयशर टेम्पोचा अपघात; लोकांनी कोंबड्या पळवल्या

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : सोलापूर पुणे महामार्गावर सकाळी कोंबड्या घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोचा अपघात झाला. लोकांनी कुठल्याही प्रकाराची मदत न करता चक्क कोंबड्याचं पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे.

सकाळी पुण्यावरून मराठवाड्याच्या दिशेने कोंबड्या घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचा अपघात होऊन टेम्पो पलटी झाला आणि लोकांनी अपघातग्रस्ताला मदत करण्या ऐवजी चक्क टेम्पोतील कोंबड्याचं पळवून नेल्या. यातून लोकांची मानसिकता दिसून येते.

यावेळी काहींनी १०-१५ कोंबड्या पळवून नेल्या तर काहींनी कोंबड्या नेण्यासाठी वेगळाच टेम्पो आणला. लोकांची कोंबड्या नेण्यासाठी झुंबड उडाली होती. घटनास्थळी पोलीस पोहोचले नसल्यामुळे गोंधळ उडाला होता. काही लोकांनी तर या अपघातात मृत झालेल्या कोंबड्या देखील पळवून नेल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here