ठाणे जिल्हा आरपीआय युवा आघाडीमध्ये नवचैतन्य निर्माण करणार अशोक कांबळे

ठाणे (प्रतिनिधी मुनिर खान) : जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये राजकीय घडामोडीला आता वेग आला आहे दहा दिवसापूर्वी ठाणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाने नवीन मोर्चेबांधणी सुरू केली आहे आज आंबेडकर रोड येथे आरपीआय समन्वय समितीचे बैठक पार पडली

यावेळी नव्या फळीचे तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या समन्वय समितीमध्ये काही ज्येष्ठ आणि युवक नेत्यांना स्थान देण्यात आले आहे केंद्रीय सचिव व ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक सुरेशदादा बारशिंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकी आयोजन भास्कर वाघमारे , प्रल्हाद मगरे , मनीषाताई कारलाद,प्रमोदजी इंगळे ,भावी युवक अध्यक्ष अशोक कांबळे, शहाजी दुपारगुडे, शितल बनसोडे,विकास चव्हाण,शंकर पाटील, विशाल ढेंगळे,व इतर अशा चौदा लोकांचा या समन्वय समितीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

लवकरच ठाणे जिल्हाला लोकशाही पद्धतीने बहुमताने निवडणूक पद्धत घेऊन अध्यक्ष नियुक्त करणार व युवक अध्यक्ष,महिला आघाडी अध्यक्ष इतर सर्व सेल चालू करणार असे ठरले त्यावेळी अशोक कांबळे व्यासपीठावर मार्गदर्शन करताना नवयुवक तरुणांमध्ये नवीन चैतन्य निर्माण करून पुन्हा चळवळीला चांगले दिवस आणणार व येणाऱ्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षासोबत युती करून निवडून येणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here