ड्रग्ज प्रकरणी आज तिसऱ्यांदा अनन्या पांडेची चौकशी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : बॉलीवूडची अभिनेत्री अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानबरोबर तिचे व्हॉट्‌सऍप चॅट एनसीबीला आढळून आल्याने त्या अनुषंगाने तिचा जबाब नोंदवून घेण्यासाठी एनसीबीने तिला पुन्हा बोलावून घेतले आहे.

गेल्या गुरुवारी अनन्याला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी दोन तास तिची चौकशी करण्यात आली. तिच्याकडचे दोन मोबाइल आणि तिचा लॅपटॉपही एनसीबीने ताब्यात घेतला. त्यानंतर चौकशीची दुसरी फेरी शुक्रवारी झाली. त्यावेळी साधारणतः चार तास तिची चौकशी करण्यात आली.

मात्र या चौकशीत काहीही ठोस पुरावे आढळले नसल्याने अनन्याला आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. अनन्या ही अभिनेते चंकी पांडे यांची कन्या आहे. ते स्वत: तिला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here