ठाणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, वृत्तवाहीनी प्रमुख रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश टोळे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने आणि कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष नितीन शिंदे व वेदांत हाँस्पीटलचे संचालक डाँ.अब्रार खान यांच्या वतीने ठाणे शहर जिल्हा सर्व सभासदांना मोफत हेल्थ कार्ड यांचे वितरण करण्यात आले,
पत्रकारिता मार्गदर्शन तसेच इको फ्रेंडली गणपती सजावट व सेल्फी विथ गणपती बाप्पा च्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण संमारंभ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 23आँक्टोबर रोजी सां.4ते 7 या वेळेत गार्डन लाँन गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते.महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर, पहिले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांना मार्गदर्शन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा माझा कुटुबं आहे. समाजाला 365 दिवस राबणारा पत्रकार बैल हवा आहे असे वक्तव्य उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना दै. जनादेश चे संपादक कैलास म्हापदी यांनी केले. पण सच्चा पत्रकारांनी अजूनही आपल्या जनसेवेचे कार्य अविरतपणे चालू ठेवलेले आहे, आपल्या भाषणात त्यांनी पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच कर्मवीर सुनिल खांबे यांनी सामाजिकतेवर भर देत पत्रकार विषयाची गांभीर्यता ओळखुन योग्य पत्रकारीता करण्याचे मार्गदर्शन करत खास आपल्या शैलीत राजकीय चिमटे घेत कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला.तसेच ठाण्यातील जेष्ठ माजी नगरसेवक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव मनोज शिंदे यांनी कार्यक्रामास उपस्थित राहुन सदर उपक्रमाचे कौतुक केले,
गणेश उत्सव सजावट स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वेदांत हाँस्पीटलचे संचालक डाँ. अब्रार खान यांच्या तर्फे संघातील पदाधिकारी व सदस्य यांना मोफत हेल्थ कार्ड देण्यात आले, ज्यामध्ये अनेक सुविधा आहेत ज्यामुळे पत्रकार यांना आरोग्यविषयाची सवलत ही वेदांत हाँस्पीटल यांच्याकडून देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदिका कांचन सोनावणे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दै. जनादेश संपादक कैलाश म्हापदी, कर्मवीर सुनिल खांबे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मनोज शिंदे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुखदेव घोलप, स्थायी समिती सभापती संजय भोईर, जिल्हा अधिकारी कार्यालय माहिती जनसंपर्क अधिकारी नंदकुमार वाघमारे, वेदांत हाँस्पीटलचे संचालक अब्रार खान प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यांचेबरोबर पत्रकार संघाचे पदाधिकारी कोकण विभागीय सचिव किशोर पाटील, पालघर अध्यक्ष विकास पाटील,ठाणे शहर सचिव मिलिंद दाभोळकर, सल्लागार प्रमोद घोलप, उपाध्यक्ष संजय भोईर, कार्याध्यक्ष अतुल तिवारी, संघटक मनोज कदम, संपर्क प्रमुख सतीशकुमार भावे,सहसचिव अमित जाधव, कल्याण संपर्क प्रमुख मिनल पवार, सहसंपर्क प्रमुख – प्रशांत मोटे, कार्यकारणी सदस्य अश्विन कांबळे,कार्यालयीन व्यवस्थापक अभिषेक चव्हाण, सह वृत्तवाहीनी प्रमुख संतोष पडवळ, प्रसिध्दी प्रमुख – देवेंद्र शिंदे, सुबोध कांबळे, अमित गुजर व इतर सदस्य – संजय ताबंडे, प्रसाद जावडे, राहूल लाड, राजेंद्र गोसावी, ख्वाजा शेख, पत्रकार सुभाष जैन,देवेंद्र वाईरकर,राहुल अहिरे, विशाल शिपाई,सतीश कुदंळे, गफूर धारवार,बिरबल बंडगर, भरत सांवत व आदी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम व्य़वस्थापक व न्यूज मराठी व तरूण आव्हान प्रतिनिधी पत्रकार मनस्वी चौधरी,पत्रकार मनीष तळदेवकर, हर्षदा जाधव, निखिल पंडम, मनाली मोरे, समाधान अवताडे, अश्विनी भालेराव, सायली घोलप उपस्थित होते.






