इंदूर (मध्यप्रदेश) : येथे एका करोडपतीच्या पत्नीचे तिच्याहून तब्बल १३ वर्षे लहान असलेल्या रिक्षावाल्यावर हृदय जडले. १० दिवसांपूर्वी ती घरातून ४७ लाख रुपये घेऊन त्या रिक्षाचालकासह पळून गेली. पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, अद्यापपर्यंत प्रियकर आणि महिलेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. याबाबत पोलीस पथक सातत्याने चौकशी करत असून, रविवारी पोलिसांनी प्रियकराच्या मित्राकडून ३३ लाख रुपये वसूल केले.
प्रियकरासोबत फरार झालेली महिला इंदूरच्या होसी कॉलनीची रहिवासी आहे. ती कुलीन कुटुंबातील आहे. महिलेचे वय ४५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ती ज्या रिक्षाचालकासह फरार झाली आहे, तो ३२ वर्षांचा आहे. रिक्षावालाचे नाव इम्रान आहे, तो त्या महिलेला ड्रॉप करायला येत असे. पाच दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांचे पथक जावरा, रतलाम आणि उज्जैन येथे छापे टाकत आहे.
महिलेच्या पतीकडे कोट्यवधी रुपयांची जमीन आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीदरम्यान पतीने सांगितले होते की, ती आपल्याला न सांगता घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीय काही दिवसांपासून वाट पाहत आहेत. मोबाईल बंद असताना संशय बळावला. नंतर, जेव्हा लोकांनी माहिती गोळा केली तेव्हा कळले की त्याचे रिक्षाचालकाशी अफेअर होते. दोघांची शेवटचे लोकेशन जावरा या शहरात होते. पोलिसांचे पथक तेथे गेले पण काहीही झाले नाही.
त्याचवेळी रविवारी इंदूरच्या खजराना पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले. बेपत्ता महिला आणि तिच्या प्रियकराबद्दल कोणतीही माहिती नाही. मात्र पोलिसांनी 33 लाख रुपये जप्त केले आहेत. हे पैसे इम्रानने त्याचा मित्र रितेश ठाकूरच्या घरात लपवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश इंदूरच्या सांवर रोडवर राहतो. दोघेही त्याच्या संपर्कात होते.






