जळगाव येथे नागरिकांच्या मदतीसाठीचे रिक्षांवर पोलीस संपर्क क्रमांकाचे स्टिकर

जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) :शहरात रिक्षा चालकांकडून सातत्याने होणार्‍या या प्रकारांना आळा घालण्यासाठी जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांच्या तत्काळ मदत मिळावी यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे रिक्षांवर माहितीपर स्टिकर लावण्यात येणार आहे. या उपक्रमाचा सोमवारी रोजी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात रिक्षांवर स्टीकर लावण्यात येवून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, योगेश पाटील, किरण मराठे, सोपान पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक लिलाधर कानडे यांनी शहरातील संपूर्ण रिक्षासह चालकांची माहिती तयार केली आहे.

रिक्षा चालक व मालकाचे नाव, परमीट क्रमांक, रिक्षा क्रमांक, मोबाईल क्रमांक यासह मदतीसाठी टोल फ्री ११२ क्रमांक, निर्भया पथकाचा १८१ क्रमांक, पोलीस नियंत्रण कक्ष 0257-2223333 व शहर वाहतूक शाखा 0257-2220766 आदी सविस्तर माहिती असलेले स्टिकर तयार करण्यात आले आहेत.

संबंधित स्टिकर रिक्षाच्या बाहेरुन आतून तसेच दर्शनी भागात लावण्यात येत आहे. संबंधित स्टिकरवर असलेल्या क्रमांकावर कॉल आल्यास तात्काळ पोलीस मदत मिळणार आहे. हे स्टिकर रिक्षांवर लावायला सोमवारपासून सुरुवात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here