खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन नोव्हेबरमध्ये जळगावला होणार

बोधचिन्हाचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच वहीगायन या लोककलेला खान्देशातील अस्सल लोककला म्हणून राजमान्यता मिळावी या साठी खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन २० व २१ नोव्हेंबरला जळगाव येथे आयोजित करण्यात येत आहे.

या संमेलनाची घोषणा व खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या बोधचिन्हाचे प्रकाशन आज जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे उपस्थित होते

खान्देश लोककलावंत विकास परिषद आयोजित या लोककला संमेलनाची पुर्व तयारी व आढावा परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी उपस्थितां समोर सादर केला या संमेलनासाठी खान्देशातील दोन हजार लोककलावंत या संमेलनात सहभागी होणार असुन शोभा यात्रा, उद्घघाटन सोहळा, परिसंवाद, पुरस्कार वितरणासह वहीगायन लोक कलेचा जागर या संमेलनात करण्यात येणार आहे लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील कार्यरत लोककलावंची मध्यवर्ती संघटना म्हणून खान्देश लोककलावंत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली असून यात वहीगायन लोककला सोबतच खान्देशी तमाशा, शाहीरी, गोंधळ, वाघ्या मुरळी ,सोगाड्या पार्टी सह गावगाड्यातील वासुदेव, पोतराज, कानबाई, भगत भोप्या, डांग, अदी खान्देशी लोककला प्रकारातील पाच हजार लोककलावंत खान्देश लोककलावंत परिषदे मधे संघटीत होऊन कार्य करीत आसल्याचे परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले

खान्देशात प्रथमच होत असलेल्या वहीगायन लोककला संमेलनाच्या आयोजना बद्दल पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी परिषदेच्या पदधिकारी यांचे अभिनंदन केले व कोविड चे सर्व नियमाचे पालन करून संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. या प्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे पदाधिकारी सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, अवधूत दलाल अरविंद पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here