मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणूक शरद पवार पुन्हा अध्यक्षपदी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणार्या , महाराष्ट्राचा मानबिंदू व समृद्ध वारसा असणार्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. महाराष्ट्र व भारताचे अग्रणी नेते श्री. शरद पवार या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत सहज निवडून आले. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.

उपाध्यक्ष पदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते. तीही निवडणूक एकतर्फीच होवून सात उमेदवार निवडून आले. उपाध्यक्षपदी निवडून आलेल्यात, सौ विद्या चव्हाण, माजी आमदार, भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी हायकोर्ट न्यायाधीश अरविंद सावंत हे सर्वज्ञात चेहरे आहेत तसेच प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, कु.अमला नेवाळकर, शशी प्रभू हेही निवडून आले आहेत.

grathsangrhalaya-election

१५ कार्यकारिणी सदस्यांची निवडदेखील बिनविरोध झाली. लवकरच कार्यकारिणी सदस्यांमधून विविध पदाधिकारी नेमण्यात येतील, असे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणूक अधिकारी किरण सोनवणें यांनी कळविले आहे. निवड झालेल्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये जयवंत गोलतकर, सुरेंद्र करंबे, उदय सावंत, रवींद्र गावडे, सुनील राणे, विनायक परब, प्रदीप ओगले, हेमंत जोशी, मनीष मेस्त्री, सौ.शीतल करदेकर, मारुती नांदविस्कर, सौ. उमा नाबर, सूर्यकांत गायकवाड, सौ.शिल्पा पितळे, स्वप्निल लाखवडे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here