हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील अपंग व्यक्ती प्रदीप कवडूजी मुकपिडवार यांनी हिंगणघाट येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
वर्धा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात घरकुल अपंग लाभार्थी प्रदीप कवडूजी मुकपिडवार राहणार डॉ मुजुमदार वार्ड हिंगणघाट यांनी सांगितले की, हिंगणघाट नगरपालिकेत प्रधानमंत्री अतिक्रमण घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे . लाभार्थी यादीची चौकशी करण्यात यावी व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा . मी दिनांक २००६ मध्ये घरकुलसाठी अर्ज दिला होता तेव्हा पण माझा घरकुलमध्ये नंबर नाही आला. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना २०१६ मध्ये अर्ज केला त्याचा टोकण नंबर ४५५ आहे. मी २०२१ मधील अतिक्रमण घरकुल यादी तपासणी तेव्हा पण माझा नंबर नाही आला. जे अतिक्रमण घरकुल यादीमध्ये नावे दाखवले आहे त्यांनी या अगोदर इतर घरकुल योजनेत लाभ घेतला आहे.
तसेच काही जणांचे पक्के घर असतानासुद्धा घरकुल मंजूर केले आहे. काही घरी नवरा-बायको तसेच आता मुलाच्या नावानेसुद्धा घरकुल योजनेत नाव आहे ही योजना गरिबासाठी आहे की पैसे देऊन घेणाऱ्यासाठी अतिक्रमण योजनेची चौकशी करण्यात यावी व मला घरकुल देण्यात यावे अन्यथा मी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
संबंधित निवेदन मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार अशोक शिंदे, पालकमंत्री सुनील केदार यांना दिली आहे.






