मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची मालिका सुरुच आहे.
नवाब मलिक यांनी थेट वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. मात्र हा दावा समीर वानखेडेंच्या वडिलांनी फेटाळला होता. तदनंतर नवाब मलिक यांनी दाऊद वानखेडेंच्या फेसबूक प्रोफाइलचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये समीर वानखेडेंच्या वडिलां सारख्या दिसणाऱ्या फोटोखाली वानखेडे दाऊद असे नाव लिहिलेले या प्रोफाईलमध्ये दिसत आहे. त्यावरून मलिक यांनी हा दाऊद वानखेडे कोण अशी विचारणा केली आहे. दरम्यान तत्पूर्वी मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे असं असून, त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला
आज सकाळीच ट्विट करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या लग्नाचा फोटो ट्विट करत सूचक इशारा दिला आहे. हा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी म्हटलं, स्वीट कपलचा फोटो – समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी.
Photo of a Sweet Couple
Sameer Dawood Wankhede and Dr. Shabana Qureshi pic.twitter.com/kcWAHgagQy— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
तर दुसऱ्या ट्विटमध्ये नबाब मलिकांनी म्हटलं आहे की, समीर दाऊद वानखेडेच्या पहिल्या लग्नाचा निकाह नामा लवकरच सादर करणार आहे. दरम्यान आज सकाळी पुन्हा एकदा नवाब मलिक एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आता नवाब मलिक कुठला गौप्यस्फोट करतात हे पहावं लागणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्याकडून वारंवार एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या विरोधात वेगवेगळे आरोप करुन गौप्यस्फोट करत असल्याचं पहायला मिळत आहे.






