भरधाव कारला बसची धडक, वृद्धासह पाच गंभीर जखमी

नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : नागपूर : भरधाव कारला स्टार बसची धडक बसल्याने कारमधील दोन वृद्धांसह पाच जण जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी हिंगणा-एमआयडीसी परिसरात हा अपघात घडला.

वसंता चहांदे (वय ६५), भोजराज राजाराम मेश्राम (वय ६२), बाळू मेश्राम (वय ५०), मनोज बागडे (वय ५०, सर्व रा. अजनी) आणि महेंद्र मेश्राम (वय ४०, रा. बालाजीनगर) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. हे सर्वजण मोहगाव झिल्पी (हिंगणा) येथील एका संपर्कातील व्यक्तीच्या अंत्ययात्रेत गेले होते. दुपारी ३.३० च्या सुमारास ते कारमधून परत येत होते. हिंगण्याच्या वासुदेवनगरात येताच मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने कारला धडक मारली. त्यामुळे कार अनियंत्रित झाली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्टार बसची कारला जोरदार धडक बसली. त्यामुळे कारचालक बाळू मेश्रामसह पाचही जण जबर जखमी झाले.

बसमधील प्रवासी आणि परिसरातील सेवाभावी मंडळींनी जखमीची मदत केली. एमआयडीसी पोलिसांना कळविले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर एमआयडीसी पोलिसांनी रात्री या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here