किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात; अटकेची प्रक्रिया सुरु

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पंच प्रभाकर साईलच्या आरोपांमुळे या प्रकरणाला अनेक वळणं मिळाली आहेत. तसेच पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे.

प्रभाकर सईल आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच आहे. तर दुसरा पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. प्रभाकर सईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती.

पंच प्रभाकर सईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ होती. पुणे पोलिसांचं पथक गोसावीला अटक करण्यासाठी लखनौला रवाना झालं होतं. गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तापासासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. फसवणूक प्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.

सोमवारी सायंकाळी गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो सरेंडर करण्यासाठी लखनौ पोलिसांकडे गेल्याची माहिती मिळाली होती. मात्र लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याचंही म्हटलं जात होतं. इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनौ पोलिसांनी दिला होता. गोसावी लखनौमध्ये आहे, हे समजताच पुणे पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. त्यामुळे आता गोसावीची अटक निश्चित मानली जात आहे.

गोसावी लखनौमध्ये असल्याचं समजताच पुणे पोलिसांचं पथक तात्काळ रवाना झालं होतं. मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात पंच आणि साक्षीदार राहिलेल्या गोसावी याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी पुणे पोलीस त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here