नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल

समीर वानखेडेंची बहीण यास्मीन वानखेडेची राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर मलिक आणि वानखेडे असा वाद उफाळला आहे. दोघंहीआरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच नवाब मलिक यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली असल्याची माहिती समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिली आहे. एएनआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाला विनंती पत्र एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं आहे. या पत्रानुसार त्यांनी विनंती केली आहे की, आपल्या संविधानिक हक्कांचं संरक्षण व्हावं. समीर वानखेडेंची साडे चार तास चौकशी, एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. क्रांती रेडकर यांनीही नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याची माहिती दिली होती.

आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून नवाब मलिक यांनी घेतलेल्या संविधानिक शपथेविरुद्ध वागत आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असून एफआयआर नोंदवण्यात आला आहे.समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा केवळ हाच त्यांचा एकच हेतू आहे. जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल, असा आरोपही क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here