ठाण्यात बांगलादेशविरोधात पार्टी कामगार आघाडीतर्फे मूक मोर्चा

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : येथे बांगलादेश विरोधात पार्टी कामगार आघाडी यांच्या संख्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मूकमोर्चा द्वारे बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात मोर्चा व जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी १५० ते २०० कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला.

यावेळी या निषेध मोर्चास भारतीय जनता पार्टी प्रवक्त्या महाराष्ट्र प्रदेश सौ. श्वेता जी शालीनी, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष – आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी आणि जिल्हा प्रभारी अर्पित माथुर, भाजपा कामगार आघाडी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष प्रशांत तळवडेकर, तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सरचिटणीस प्रशांत पवार, श्री. बनसोडे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हा निषेध मोर्चा स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवाजी तलाव येथून सविधान चौक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मूकमोर्चा द्वारे करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here