श्रीनगर (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : प्रवासी मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मिनी बस दरीत कोसळून हा भीषम अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपात्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल यांनी दु:ख व्यक्त केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या डोडा परिसरात मिनी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात मिनी बसचं तर मोठं नुकसान झालं. याच सोबत ११ जणांनी जीव गमवला आहे. अॅम्ब्युलन्सच्या मदतीने जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. घटनास्थळावर बचावकार्य अद्याप सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
Jammu and Kashmir | 8 persons dead, several injured as a mini bus travelling from from Thathri to Doda fell into a gorge. Rescue operation underway: Additional SP, Doda pic.twitter.com/7UaRDGOV5i
— ANI (@ANI) October 28, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, डोडा जिल्ह्यातील मछीपाल कहरा रोडवर हा अपघात झाला. दोडा येथून मिनी बस जात असताना बसचा तोल बिघडून ती दरीत कोसळली. अपघातानंतर परिसरात मोठा आरडाओरडा झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि बचावकार्य सुरू केलं. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.






