पेटता फटाका डोळ्यात घुसल्याने ९ वर्षीय मुलाचा डोळा झाला निकामी

हिंगोली (प्रतिनिधी) : दिवाळी सर्रास लहान मुलं फटाके फोडून आनंद साजरा करतात. मात्र, फटाके फोडताना सावधगिरी न बाळगल्यास काय होऊ शकते हे औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेवरून स्पष्ट झाले आहे. गोजेगाव गावामध्ये गुरुवारी सकाळी फटाके फोडत असताना अचानक फटाका डोळ्यावर लागल्यामुळे नऊ वर्षाचा साईनाथ घुगे या चिमुकल्याचा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे.

साईनाथ गुरुवारी सकाळी फटाके फोडत होता. मात्र, अचानक त्यातील एक फटाका उडून त्याच्या डोळ्याला लागला. या फटाक्यामुळे साईनाथच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली. साईनाथच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. या अपघातानंतर साईनाथला तातडीने नांदड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या डोळ्याला मोठी दुखापत असल्याने त्याला हैदराबाद येथे हलवण्यात आले.

सध्या दिवाळी असल्याने लहान मुले उत्साहात फटाके फोडत आहेत. परंतु फटाक्यांचे दुष्परिणामही होताना दिसत आहेत. फटाक्यामुळे चिमुकल्या साईनाथला आपला डोळा गमवावा लागला हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here