मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : एनसीबीचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक रोज नवनवीन खुलासे करत आहेत.आता नवाब मलिक यांनी एका व्यक्तीचा क्रूझवर धमाल डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिलाही त्या पुरुषासोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशिफ खान फॅशन टीव्हीचे एमडी आहेत. कॉर्डिएला क्रूझ जहाजावर काशिफ खानने पार्टी आयोजित केली होती. एनसीबीने याच क्रूझ जहाजावर छापा टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना ताब्यात घेतले. नवाब मलिक यांनी याआधी क्रूझ जहाजावरील दाढीवाल्या व्यक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. हा दाढीवाला काशिफ खान असल्याचे मानले जात होते. आता हा व्हिडिओ नवाब मलिक यांनी शेअर केला आहे.
Video of Kashif khan dancing on the Cruise ship pic.twitter.com/JoSsYF9Ux1
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 29, 2021
नवाब मलिक म्हणाले की, काशिफ खानचे समीर वानखेडेशी जवळचे संबंध आहेत. यापूर्वी नवाब मलिक यांनी काशिफ खानवर आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया असल्याचा आरोप केला होता. नवाब मलिकने सांगितले की, तो सेक्स रॅकेट चालवतो. तसेच काशिफ खानचे समीर वानखेडेसोबत संबंध आहेत. या प्रकरणी काशिफ खानला अद्याप अटक का करण्यात आली नाही, असे मलिक म्हणाले.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर क्रूझवर जाणाऱ्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग किंग उपस्थित असल्याचा आरोपही केला होता. त्या पार्टीत त्याची मैत्रीणही बंदूक घेऊन हजर होती. मलिक म्हणाले की, दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया असून एकेकाळी तिहार तुरुंगात कैद होता. मात्र समीर वानखेडे यांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला सोडून दिले.






