माजी आमदार स्व.कांतिभाई कोळी स्मृतीपित्यर्थ भोजनाचा कार्यक्रम

चोपडा (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर मिलिंद वाणी) : स्व.कांतीजी कोळी यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार स्व.कांतीजी कोळी साहेब यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले.स्व.कांतिभाई कोळी हे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी संघटनेच्या विस्तारासाठी महाराष्ट्रसह भारतभर आर्थिक,शारीरिक व बौद्धिक परिश्रम घेतले आहेत.दिल्ली येथील कोळी भवनासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता.

माजी आमदार स्व.कांतिभाई कोळी स्मृतीपित्यर्थ भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी परेशभाई कोळी प्रदेश युवक अध्यक्ष,अखिल भारतीय युवा कोळी समाज नवी दिल्ली(रजि0)यांचे आदेशानुसार तसेच सिद्धार्थ दादा कोळी,प्रदेश कार्याध्यक्ष,अनिलदादा देविदास नंन्नवरे खांदेश विभागीय उपाध्यक्ष, तथा खांदेश विभागीय युवक कार्यअध्यक्ष यांचे मार्गदर्शनाने व प्रमुख पुढाकाराने आज जळगाव येथील सावखेडा शिवारातील केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री आनंद आश्रमातील(वृद्धाश्रम)येथे भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

तसेच चोपडा तालुक्यातील मौजे पांढरी या सातपुड्यातील दुर्गम भागातील खेडे गावातील १२५ कुटुंबीयांना फरसाण वाटत करण्यात आले.यावेळी खांदेश विभागीय उपाध्यक्ष तथा खांदेश विभाग युवक कार्यअध्यक्ष अनिलदादा नंन्नवरे,धनराजभाऊ साळूंके जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष गोपालजी सोमा बाविस्कर व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here