छत्तीसगढमध्ये चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

दंतेवाडा (छत्तीसगड) : जिल्ह्यात नक्षलवादी व सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अडवाल आणि कुंजेरास या गावाच्या मध्ये असलेल्या जंगलात जवानांनी शोध मोहीत सुरू केली होती.

यावेळी जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर जवानांना तीन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. राजे मुचाकी, गीता मरकम आणि ज्योती उर्फ भीमे नुप्पो अशी त्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.

या सर्वांच्या डोक्यावर पाच लाखांचे बक्षिस होतं. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, बोर गन, आईडी, माओवादी पुस्तकं सापडली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here