शाहरुख खानचे फॅन्स म्हणून मन्नतवर आलेले दोन चोर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : क्रूझ पार्टी प्रकरणी अटक झाल्यानंतर, २६ दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर जामीनावर सुटका झाली. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खान आपल्या लेकाला घेण्यासाठी आला होता. शाहरुख खान सोबत वकिलही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच, आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतही सज्ज झालं आहे. मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मन्नतबाहेरही चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. परंतु या गर्दीत काही संधीसाधू ही होते.

गर्दी असल्याने काही मोबाईल चोर मन्नत बाहेर ठाण मांडून होते आणि वेळ मिळताच त्यांनी काही चोऱ्या देखील केल्या पण अखेर हे चोर पोलिसांच्या तावडीत सापडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here