ड्रग्स पेडलरसोबत भाजपचं नेमकं कनेक्शन काय?; राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांचा सवाल

ड्रग्स पेडलरसोबत अमृता फडणवीसांचा फोटो

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्यात आणि देशात सध्या ड्रग्स प्रकरणावरुन बराच गदारोळ सुरु आहेत. अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात महाराष्ट्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि समीर वानखेडे गोत्यात आलेले असताना रोज भाजप संबंधितांचे कनेक्शन्स उघड होतं आहेत. मात्र, असं असताना आता निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकाने अमृता फडणवीसांचा एक फोटो शेअर करुन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर करुन भाजपचं ड्रग्स नेक्सस असं म्हटलं आहे. हा फोटो अमृता फडणवीस यांचा असून यामध्ये जयदीप चंदूलाल राणा असल्याचा दावा निशांत वर्मा यांनी केली आहे. त्यांच्या मते, जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून २०२१ मध्येच अटक करण्यात आली होती.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला असून त्यांच्यासोबत जयदीप चंदूलाल राणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निशांत वर्मा यांच्या मते, ‘जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून २०२१ मध्ये एनसीबीने अटक केली आहे. जो अद्यापही तुरुंगातच आहे. अशावेळी भाजपचं त्याच्या नेमकं कनेक्शन काय?’ असा सवाल विचारत निशांत वर्मा यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here