‘मिस केरळ’ विजेती ॲन्सी कबीर, उपविजेती जना शाजानचा कार अपघातात मृत्यू

कोची (केरळ) : मिस केरळ स्पर्धेची २०१९ सालातील विजेती ॲन्सी कबीर आणि याच स्पर्धेची उपविजेती राहिलेली अंजना शाजान या दाेघींचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. कारमध्ये बसलेले इतर दाेन प्रवासी जखमी झाले आहेत.

एका माेटारसायकल स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार उलटून हा अपघात झाला. केरळच्या काेचीजवळ पहाटे १ च्या सुमारास घटना घडली. ॲन्सी कबीर ही तिरुवनंतपुरम येथील रहिवासी आहे. तर अंजना ही थ्रिशूर येथे राहणारी आहे. दाेघींनी २०१९च्या मिस केरळ स्पर्धेत सहभाग घेतला हाेता. दाेघीही चांगल्या मैत्रिणी हाेत्या.

काेचीमध्ये एक फाेटाे शूट उरकून दाेघी थ्रिशूर येथे जात हाेत्या. राष्ट्रीय महामार्गावर चक्करपरांबू येथे एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार एका झाडाला धडकली. ही धडक एवढी भीषण हाेती की दाेघींही जागेवरच गतप्राण झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here