शेगाव येथील कोळी समाज महामेळाव्यास उपस्थितीचे आवाहन

चोपडा(महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर मिलिंद वाणी) : श्रीक्षेत्र, शेगाव येथे आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.७ नोव्हेंबर २०२१ (रविवार) रोजी स.९ ते सायं.५ या वेळात हॉटेल कृष्ण कॉटेज, कान्हा उत्सव हॉल,खामगाव रोड, शेगाव (जि.बुलढाणा) या ठिकाणी कोळी समाजाचे राज्यस्तरीय भव्य अधिवेशन व महामेळावा आयोजित करण्यात येत आहे.

ह्या अधिवेशनात आदिवासी कोळी जमात व अन्य ३३ अन्यायग्रस्तं जमातींचे समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनाहि विशेष आमंत्रित करण्यात आलेले आहे.अशी माहिती चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर(गोरगांवले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.

ह्या अधिवेशनात सामाजिक लढ्यासाठी पुढील दिशा ठरविण्यात येणार असून अनेक मोठे निर्णयही घेतले जाणार आहेत. तसेच अधिसंख्य कर्मचारी,अधिकारी यांचे वेतन,वेतनवाढ तसेच सेवानिवृत्ती धारकांचे देय, निवृत्तीलाभ,जात प्रमाणपत्र,वैधता प्रमाणपत्र या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याप्रसंगी श्री गजानन महाराज दर्शनाचा लाभ घेणेसाठी आधीच मंदिर संस्थानच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे.यासाठी चोपडा(अनु.जमाती)विधानसभा मतदारसंघातील समस्त कोळीसमाजाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,कर्मचारी,अधिकारी,समाजबांधव यांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या महामेळाव्यास उपस्थित रहावे,असेही आवाहन जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here