पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : पोलिस कर्मचाऱ्याच्या त्रासाला वैतागून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देलवडी येथे समोर आली आहे. महिला पोलीसाने बुधवारी (दि.३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.
सध्या सध्या लोकरी मणिकपूर वसई मुंबई येथे राहिवासी असलेल्या दिपाली बापुराव कदम (वय-२६ रा. देलवडी) या पोलीस नाईक पदावर सेवेत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मयत दिपाली कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपला भाऊ रोहितला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वाल्मीक गजानन अहिरे (रा. पालघर, मुंबई) याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. दोन वर्षापूर्वी दिपाली कदम यांची पोलीस खात्यात असणाऱ्या वाल्मीक अहिरे याच्यासोबत ओळख झाली होती. यानंतर आरोपी अहिरे हा वारंवार दिपालीला शाऱीरिक व मानसिक त्रास देत होता. दिपालीचे नुकतेच लग्न जमले होते. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी तिचा साखरपुडा झाला होता. १६ नोव्हेंबर रोजी मयूर कांबळे यांच्यासोबत विवाह होणार होता. साखरपुडा आणि लग्नासाठी त्या आपल्या मुळगावी आल्या होत्या. दिपालीचे लग्न जमल्याचे समजल्यानंतर वाल्मीक अहिर याने तिच्या होणाऱ्या पतीला आणि त्यांच्या वडिलांना फोन करुन दिपाली संदर्भात माहिती दिली.
वाल्मीक अहिरे याने मंगळवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास दिपालीचा भाऊ रोहितला फोन करुन तुम्ही तिचे इतर कोणाशी लग्न करु नका नाहीतर तुम्हाला मारुन टाकेल अशी धमकी दिली. मंगळवारी रात्री कुटुंबाने दिपालीला समजावून सांगितले. बुधवारी पहाटे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाब दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.






