विमानतळ परिसरातून एनसीबीने जप्त केले ४ कोटीचे हेरॉइन

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण चर्चेत असतानाच एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने आज मुंबई विमानतळ परिसरात मोठी धड़क कारवाई केली आहे.

विमानतळाजवळच्या कार्गो कॉम्प्लेक्स येथून ४ कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त करण्यात आले असून गुजरातमधील एका व्यक्तीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.विमानतळ परिसरात कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.

एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली. हे हेरॉईन असल्याची माहिती आहे. ज्याची किंमत ४ कोटी रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here