बीजिंग (चीन) : चीनचे माजी उपपंतप्रधान झ्यॅंग गाओली यांच्यावर पेंग शुआई या व्यावसायिक टेनिस खेळाडूने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपांची एक ऑनलाईन पोस्ट पेंग शुआई हिने चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेबोवर पोस्ट केली आहे.
गाओली हे सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्यही आहेत. तीन वर्षांपूर्वी वारंवार विरोध केल्यानंतरही गाओली यांनी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप शुआई हिने केला आहे. सात वर्षांपूवी गाओली यांच्याबरोबर संबंध आले असल्याचेही शुआई हिने म्हटले आहे.
पेंग शुओई ही टेनिसमधील दुहेरीची आघाडीची खेळाडू होती. तिने विंबल्डनसह एकूण २३ मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. तिने मंगळवारी रात्री केलेल्या या पोस्टमागील सत्यता पडताळून बघितली जाऊ शकलेली नाही. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पेंगच्या अकाऊंचवरून ही पोस्ट हटवण्यात आली आहे. पेंगच्या अकाऊंचवर या पोस्टचा शोध घेतल्यास आता ही पोस्ट उपलब्ध नाही. २०१८ मध्ये चीनमध्ये ‘हॅशटॅग मिटू’ अभियान जोरात सुरू झाले होते. तेंव्हापासून एखाद्या सरकारी अधिकाऱ्याविरोधात झालेला हा मोठा आरोप आहे.






