पंतप्रधान मोदींचा आज केदारनाथ दौरा; श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन करणार

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा केदारनाथ दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या केदारनाथ दौऱ्यावर जाणार असून त्यानिमित्तानं केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला ८ क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी सुरु झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला आठ क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील.

केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत. श्री आदि शंकराचार्य मंदिरात पोहचण्याचा मार्गावर ८७ मंदिरात भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे. केदरनाथधाम यात्रेच्या क्षणाला ऐतिहासिक करण्यासाठी भाजपने एक राष्ट्रव्यापी योजना बनवली आहे. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरे असे मिळून एकूण ८२ मंदिरात साधू, भक्तांना आणि नागरिकांना आमंत्रित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here