पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : लॉजमध्ये काम करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीला डांबून ठेवून लॉज मालकाने बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. याप्रकरणी लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा प्रकार सोमवार पेठेतील राजहंस लॉजमध्ये २००८ ते २०१९ या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश अगरवाल (वय-६९ रा. भोसले नगर, गणेश खिंड रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा राजहंस लॉजचा मालक असून फिर्यादी या त्यांच्याकडे कामाला होत्या. २००८ मध्ये आरोपीने लॉजमधील एका रुममध्ये फिर्यादी यांना बंद करुन त्यांचा विनयभंग केला. तसेच आरोपीने जबरदस्तीने फिर्यादीसोबत शाररिक संबंध प्रस्थापीत केले.
यानंतर आरोपीने २०१९ पर्यंत वेळोवेळी फिर्यादी यांच्या गरीबीचा फायदा घेऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी लॉज मालकाविरुद्ध ३७६ (२) (एन), ३५४, ३४२, ४१७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.






