शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणणार – आ.बाजोरिया

दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम ; नगर सेवकांशी साधला संवाद

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी कारंजा येथील दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात नगर सेवकासह शहरातील नागरिकांशी दिलखुलास संवाद साधून शहरातील विविध समस्यांचा समाधान करून शहराच्या विकासासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली.

आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मो.युसूफ पुंजानी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये विधान परिषदेचे सदस्य आ.गोपीकिसन बाजोरिया, नगराध्यक्ष शेषराव ढोके, माजी नगराध्यक्ष ऍड.विजय बगडे, जयबाजोरिया, दिप बाजोरिया,यश बाजोरिया, अंश बाजोरिया, निरज सुरेखा,जुबेर बेग मिर्झा आदिची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी आपल्या प्रस्थाविकात नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी शहरातील विविध विकास कामाच्या निधीचा मुद्दा आमदार बाजोरिया यांच्या समोर मांडला. तसेच शहराच्या मुख्य मार्गाच्या दुरुस्ती सह पुरातन दिल्ली वेस,पोहा वेस सुरू करण्याची मागणी नगरसेवकांच्या व नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ नगर सेवक एम.टी.खान यांनी केली. या वर आमदार बाजोरिया यांनी तात्काळ जिल्हाधिकारी षण्मुराजन एस यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला व तात्काळ दिल्ली वेस,पोहा वेस विषयी बैठक लावून संबंधित कंत्राटदारला समज देऊन राहदरीस मार्ग उपलब्ध करून देण्याची सूचना दिली. तसेच नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या मागणी नुसार निधी उपलब्ध करून देऊ व प्रलंबित असलेल्या विविध योजनेतील निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही आपला भाषणातून आ.बाजोरिया यांनी केली.

अध्यक्षीय मनोगतात मो.युसूफ पुंजानी यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या योजना नगर पालिकेच्या माध्यमातून अंमलात आणण्याकरिता कटिबद्ध असल्याचे अभिवचन त्यांनी उपस्थितांना दिले. या कार्यक्रमात उपाध्यक्ष जुम्मा पप्पुवाले, गटनेता फिरोज शेकुवाले, नगर सेवक सलीम गारवे, मुबारकखां तमीजखां, चांदशा कासम शा,अ.एजाज अ.मन्नान, जाकिर शेख इस्लामोद्दीन शेख, रुबिनापरविन इरफान खान, सलीम प्यारेवाले, राजु इंगोले, अ.रशीद, जाकिर अली, अ. आरीफ, अनिसाबी शे. युनुस, प्रतिभा सोनोने, चंदन गणराज, प्रमोद गायकवाड, इरशाद अली,सै. मुजाहीद, निसारखान, जावेद रऊफखान, उमेश माहितकार, भीमराव कोळकर, सुरेश गढवाले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रस्ताविक नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी केले तर संचालन गटनेता एड.फिरोज शेकूवाले व आभार हमीद शेख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here