मुंबई (संपादक सुनिल पाटील) : येथील दिशा प्रतिष्ठान द्वारा मालाड परिसरातील अनाथ आश्रमातून घरगुती फराळ वाटप तथा मुलींसाठी पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
संस्था अध्यक्ष सौ. दिशा कळंबे यांच्यासमवेत नम्रता हातनकर, सुप्रिया सावंत, रजनी फडके, शशिकला नायर, जागृती भोसले, विष्णु रांबाडे, गीता राऊत, निरू जेरवानी, मेधा म्हस्करे, प्रीती अनंदिनी इत्यादी गृहिणी याप्रसंगी उपस्थित होत्या. दिवाळीच्या मुहूर्तावर अनाथाश्रमातील व्याधिग्रस्त बालिकांना घरगुती फराळ खाण्यास उपलब्ध व्हावा तसेच त्यांच्या सणाची सुरुवात ही मायेच्या स्पर्शाने व्हावी यासाठी दिशा फाउंडेशन मध्ये कार्यरत विविध मध्यमवर्गीय स्त्रिया याप्रसंगी आवर्जून उपस्थित होत्या.
स्वतः घरी तयार केलेला फराळ उपस्थित महिलांनी बालिकांना खाऊ घातला. वैश्विक आपत्ती कोविड दरम्यान अनेक आपत्तींना मध्यमवर्गीय तसंच अनाथाश्रमातील बालिका तोंड देत होत्या त्या नंतर आलेला दिवाळी हा मोठा सण या गृहिणींनी बालीका समवेत साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. फराळ समवेत मुलांच्या परिपूर्ण वाढीसाठी पौष्टिक पेय आणि पौष्टिक आहार वितरित करण्यात आला. या प्रसंगी वेद फाउंडेशन अध्यक्ष श्री स्वप्नील राणी नंदकुमार व डिजायर सोसायटीच्या अनुजा बागेश्वर उपस्थित होत्या.






