मुंबई (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातून कार्यरत साई परिवार सेवा संस्था द्वारा व्याधीग्रस्त बालकां समवेत भाऊबीज उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्था अध्यक्ष मंगेश रासम, सौ. मनीषा रासम, अनिल वडके, विलास देवळेकर यांनी याप्रसंगी आहार वाटप केला. नंदा फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार यांनी याप्रसंगी फराळ तथा मिठाई वितरित केली.
मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनात सर्व बालकांनी प्रदूषण विरहित फटाके वाजवून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.






