मुंबई (संपादक सुनिल पाटील) : नंदा फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार व गुन्हे शाखेत कार्यरत साहित्यिक उत्तम तरकसे यांच्याद्वारे श्रीमती इंदिरा गांधीं यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नवी मुंबई येथील लहान बालकांना चित्रस्पर्धा सन्मान पत्राने गौरविण्यात आले.
विविध वयोगटातील बालकांचा उत्साह वृद्धिंगत व्हावा यासाठी संस्था सदैव तत्पर असून दिवाळी मध्ये नव्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत असे प्रतिपादन स्वप्निल राणी नंदकुमार यांनी यावेळी व्यक्त केले. तर मुलांनी अभ्यासासमवेत इतर कार्यात सहभागी होत सक्षम व्हावे असे आवाहन उत्तम तरकसे यांनी केले.
या सन्मान सोहळ्यास विशेष उपस्थित आयकर विभागात कार्यरत साहित्यिक कवी विलास देवळेकर यांनी कवितेच्या माध्यमातून मुलांचे प्रबोधन केले.






