ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी समजण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळ यांनी राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटीतील कर्मचारी यांनी आपल्या मागण्या साठी आंदोलन केले आहे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेत ला तपशील मान्य नसल्याचे म्हणत एसटी कर्मचारी संघटनांनी व इतर सामाजिक संघटनेने सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे परंतु सदर संघटनेतील एसटी महामंडळातील याची माहिती न्यायालयासमोर सोमवारी दिली आहे.
गेले अनेक वर्ष समान वेतन नुसार एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नाही त्यांची पिळवणूक केली जाते आणि त्यांना कोणतेही सुख सुविधा दिल्या जात नाही अशा असंख्य मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे परंतु त्याची दखल महाविकास आघाडी सरकारने आजपर्यंत घेतली नाही. त्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळ यांना सरकारी कर्मचारी प्रमाणे विलीनीकरण करावे या मागणीसाठी महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती कडून जाहीर पाठिंबा देत असल्याचे सिद्धार्थ डी जाधव, संस्थापक संचालक एम एस एफ तथा पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती, धीरज वी पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अमोल माने प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले आहे.






