कोथळी येथील जबरी घरफोडी प्रकरणी दोघांना अटक

जळगाव ( क्राइम रिपोर्टर शेख रिजवान) : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी दोघा गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांच्या शोध पथकाने जळगाव शहरातुन अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोहनसिंह जगदीशसिंग बावरी व सातविर सिंग बतमतसिंग टाक ( दोघे रा. तांबापूरा शिरसोली नाका जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोघांचे नाव आहे. ३१ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील नंदुरबारकर सराफ यांच्या ज्वेलरी दुकानात घरफोडी झाली होती. या घरफोडी प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्हातील मुख्य आरोपी मोनूसिंग जगदीशसिंग बावरी (शिकलघरवाडा तांबापुर जळगाव) यास मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथून ६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. दरम्यान ५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी विनोद शिंदे यांच्या घरी चोरी झाली. या घटनेत एकूण ४ लाख ८३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता.

नंदुरबारकर सराफ यांच्याकडील चोरीप्रकरणी मोनू सिंग बावरी यास मुक्ताईनगर तालुक्यातुन अटक करण्यात आली होती. त्याच परिसरात व त्याच कालावधीत कोथळी येथे विनोद शिंदे यांच्याकडे देखील चोरी झाली होती. त्या चोरीत अटकेतील मोनुसिंग बावरी व त्याचा दोघा साथीदारांचा सहभाग असल्याचे पो.नि. प्रताप शिकारे यांना समजले. त्या महितीच्या आधारे शिताफीने साफळा रचून मोनुसिंग बावरी व याचा भाऊ मोहन सिंग जगदीशसिंग बावरी व सातविरसिंग टाक या दोघांना जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरातून ८ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.

या कारवाईत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. नितिन पाटील, पोलिस नाइक सैयद इमरान, सुधीर साळवे, पो.कॉ. किशोर पाटिल, गोविंदा पाटिल, सचिन पाटील, आदिंनी सहभाग घेतला. अटकेतील दोघा गुन्हेगारांना मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here