भारती विद्यापीठ आयएमईडी कॅम्पस विद्यार्थ्यांनी फुलला

आयएमईडीमध्ये मॅनेजमेंट विद्यार्थ्याचे उत्साहात स्वागत

पुणे (सह संपादक प्रभाकर निकम) : कोरोना काळातील अद्यापन ऑनलाईन प्रणालीवर गेल्यानंतर पावणेदोन वर्षाच्या खंडानंतर भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( आयएमईडी ) कॅम्पस विद्यार्थ्यांनी बुधवारी फुलला ! कमानी उभारुन, रांगोळया काढून , गुलाब पुष्प -चॉकलेट देऊन या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

आयएमईडीचे संचालक , भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ‘कोरोना साथीच्या काळातदेखील ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत होते. शंभरहून अधिक कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते.

आता विद्यार्थीच कॅम्पसमध्ये आल्याने विविध शैक्षणिक उपक्रम अधिक उत्साहात आयोजित करता येणार आहेत, असे डॉ. सचिन वेर्णेकर यांनी सांगितले. यावेळी एमसीए विभागाचे इन चार्ज डायरेक्टर, एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए विभागांचे फॅकल्टी को- ऑर्डिनेटर्स उपस्थित होते. आज प्रवेश देताना विद्यार्थ्यांची लसीकरणाची प्रमाणपत्रे तपासण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here