धाराशिव संचलित वसाका कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) : येथील धाराशिव संचलित वसाका कारखान्याचा ३६ व्या गाळप हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदिपन सभारंभ उत्साहात संपन्न झाला. दि ९ नोंहेबर रोजी सायंकाळी उशिरा धाराशिव संचलित वसाकाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे बॉयलर विभागाचे कर्मचारी चेतन दुसाने यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून, बॉयलर अग्नीप्रदिपन करण्यात आले , यावेळी कारखान्याचे संचालक आबासाहेब खारे, संदीप खारे , संजय खंदारे , कार्यकारी संचालक अमर पाटील, कृष्णा पाटील, वसाका मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव, अध्यक्ष अशोक देवरे ,चिप इंजिनिअर शेलार, चीफ अकाऊंन्टट कोर, निलेश पाटील सुरक्षा अधिकारी किरण आहीरे कौतीक दळवी,शेतकी अधिकारी सुरेश शिंदे, चीफ केमिस्ट् सुर्यवंशी, कोजन इन्चार्ज संतोष कचोर इंजिनिअर चव्हाण , वाघ , अजित गोविलकर , रनदीवे , वसाका मजदुर युनियनचे उपाध्यक्ष त्रंबक पवार नंदु जाधव बापु देशमुख, दीपक पवार , साहेब राव झाल्टे, समाधान गायकवाड ,सुरज पवार , कौतिक दळवी , प्रभाकर सोनवणे ,अजित मोरे, निंबा निकम ,जितु पाटील, शिवाजी आहीरे, मुन्ना पवार आदीसह शेकडो कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

dharashiv-boiler-start

यावेळी धाराशिव संचलित वसाकाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याशी कामगारांच्या थकीत वेतन , ओव्हर टाईम , तसेच रोजंदारीवरील कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात काही कामगारांनी भेट घेऊन चर्चा केली असता, अभिजित पाटील यांनी सांगितले की, कारखाना सुरळीत सुरू झाल्यानंतर याबाबतीत सकारात्मक विचार करु. यासाठी सर्व कामगारांनी योगदान देऊन हा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, अशी माहिती वसाका मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली, युनियन अध्यक्ष अशोक देवरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here