जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील सिंधी कॉलोनी भागात प्रतिबंधित पान मसाला तंबाखू व सिगारेटच्या अवैध साट्यावर कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या अखत्यारीत ६७ हजार ५९५ रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
९ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. संतोष हुकूमतपाल राजपाल ( घर नं. ४२. संत राजाराम नगर सिंधी कॉलोनी जळगाव) यांच्या राहत्या घरात हा साठा आढळुन आला. कारवाई दरम्यान घरात संतोष राजपाल मात्र हजर नव्हते. त्यांच्या पुतण्या कैलाश खेमचंद राजपाल याच्या उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली.
पोलिस नाइक दीपक चौधरी, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष राजपाल याच्यविरुद्ध भा.द.वि. १८८, २७२, २७३, ३२८, व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६(२)(१),(२६)(२), (४) (२७)(३), (डी) २८, (३)(ई),५८,५९, प्रमाणे कायदेशीर करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.ना. गणेश शिरसाळे, पो.ना. मिलिंद सोनवणे, पो.ना. सैयद इमरान, पो.ना. सुधीर सापळे, पो.ना. कृष्णा पाटिल, पो.कॉ. किशोर पाटिल, पो.का गोविंदा पाटिल, पो.कॉ. सचिन पाटील, आदिंनी या कारवाई सहभाग घेतला. त्याना जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, पो.का सागर सूर्यवंशी, पो.का. अनिल सुखराम खंदाळे, पो.का. संदिप सोनवणे, (नेमणुक आर.सी.पी. प्लाटुन,) पोलिस मुख्यालय आदिंनी सहकार्य केले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे करत आहे.






