धरणगाव (तालुका क्राइम रिपोर्टर ज्ञानेश्वर महाडीक) : एलपीजी वाहनांमध्ये घरगुती गैस भरुण विक्री करणा-या दोघांना गैस सिलेंडरच्या साठ्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनखाली या प्रकरणी एमआईडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीअनुसार सिराज खान रजाक खान, उर्फ शेरखान, (वय ३०) रा. मास्टर कॉलोनी जळगाव व जहांगीर खान, रफीक पटेल, ( वय ४४) रा. सदाशिव नगर शेरा चौक जळगाव या दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३४७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ६८६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कार्रवाईत रोख रक्कम १९२० तसेच ८४८० रुपये किमतीचे भारत गैस कंपनीचे भरलेले चार घरगुती सिलेंडर २८८०० रुपये किमतीचे भारत गैस कंपनीचे २४ रिकामे सिलेंडर १२०० रुपये किमतीचे इन्डेन कंपनीचे एक रिकामे सिलेंडर, १२०० रुपये किमतीचे एचपी कंपनीचे एक रिकामे सिलेंडर, १५०० रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा व १२००० रुपये किमतीचा गैस भरण्याच्या (पंप मशीन) असा एकुण ६८६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिराज खान रजा खान उर्फ शेरखान व जहांगीर रफीक पटेल या दोघांना अटक करण्यात आली आहे. मास्टर कॉलोनी परिसरात काही इसम घरगुती सिलेंडरमधील गैस वाहनांमध्ये बेकायदा भरुन देत असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी तयार केलेल्या पथकाने सदर कार्रवाई केली पो.नि. प्रताप शिकारे , स.पो.नि. प्रमोद कठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटिल, पोलिस नाइक मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, आदींनी या कार्रवाईत सहभाग घेतला. त्यांना जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी पोलिस नाइक सलीम तड़वी, पोना रविंद्र मुक्ति राय, पोना महेश महाले, पो. कॉ समाधान पाटील, आदींनी मदत केली.






